Home धर्म-समाज यावल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित अभिवादन

यावल येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित अभिवादन


यावल -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । व्यास शिक्षण मंडळ व्दारे संचालित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल येथे राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाचे अध्यक्ष रंजना महाजन यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या दिपाली धांडे यादेखील उपस्थित होत्या. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका गौरी भिरूड व राजश्री लोखंडे यांची उपस्थिती होती. त्यानंतर शाळेतील शिक्षिका श्रद्धा बडगुजर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रा बद्दल माहिती देऊन त्यांनी केलेल्या समाज प्रबोधनाची माहिती सांगून गीत सादर केले . व विद्यार्थ्यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले . प्राचार्या यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून 135व्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या . सूत्रसंचालन शिक्षिका डिंपल इंगळे यांनी केले . आभार शिक्षिका कुंदा नारखेडे यांनी मानले.


Protected Content

Play sound