पाचोरा, प्रतिनिधी | येथील विघ्नहर्ता मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रीया आजवर पार पडल्या असून येथे सगळ्याच प्रकारच्या शस्त्रक्रीया करता येण्याची अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहे. अशी माहिती या हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेले कन्सल्टंट जनरल सर्जन डॉ.संदीप इंगळे (एम.बी.बी.एस., डी.एन.बी.) यांनी लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’शी बोलताना दिली आहे.
जिल्ह्याच्या ठिकाणीही क्वचितच आढळणाऱ्या वैद्यकीय सुविधा पाचोऱ्यासारख्या तालुक्याच्या ठिकाणी असणे, हे नागरिकांचे मोठे नशिब आहे. येथे कठीणात कठीण शस्त्रक्रीया करण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत. शस्त्रक्रीया करण्यासाठी लागणारा बॅकअप सुसज्ज स्थितीत उपलब्ध असल्याने इथे रुग्णसेवा केल्याचे समाधान लाभते. त्यातच या सगळ्या सुविधा हॉस्पिटलचे संचालक डॉ.भूषण मगर व डॉ.संजय गरुड हे रुग्णांना अत्यल्प दरात पुरवित असल्याने त्यांची आर्थिक बचतही होत असते. त्यामुळे गरजू रुग्णांनी येथील सुविधांचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही डॉ. इंगळे यांनी केले आहे.