Home धर्म-समाज यावलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) कडून महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात 

यावलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) कडून महात्मा ज्योतीबा फुले जयंती उत्साहात 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) पक्षाच्या वतीने क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि आदरभावाने साजरी करण्यात आली. समाजसुधारणेच्या कार्याची प्रेरणा घेण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.

यावलच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. स्त्री शिक्षणाचे प्रणेते आणि पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणारे थोर समाजसुधारक म्हणून फुले यांचे कार्य अधोरेखित करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करण्यात आला. कार्यक्रमात पक्षाचे ज्येष्ठ पदाधिकारी भगतसिंग पाटील, अॅड. देवकांत पाटील, विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार, युवक राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) चे तालुकाध्यक्ष आकाश चोपडे, कदीर खान, विनोद पाटील, जितेंद्र सोनवणे, विलास अडकमोल, सचिन पारधे, पंकज डांबरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि मानवतावादी कार्याचा आढावा घेत त्यांच्या विचारांची आजच्या काळातही तितकीच गरज असल्याचे मत व्यक्त केले. समाजातील दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान सावदा येथील माजी प्रथम महिला नगराध्यक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते राजेश वानखेडे यांच्या मातोश्री ताराबाई वानखेडे यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस (अ प) यावल पक्षाच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना करण्यात आली.


Protected Content

Play sound