Home क्राईम ‘लाडकी बहीण’ योजनेच्या कामाचे आमिष दाखवून विवाहितेचा विनयभंग

‘लाडकी बहीण’ योजनेच्या कामाचे आमिष दाखवून विवाहितेचा विनयभंग


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शासकीय योजनेचे काम करून देतो असे आमिष दाखवून आणि केवायसी (KYC) कागदपत्रे घेण्याच्या बहाण्याने एका विवाहितेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गेंदालाल मिल परिसरातील एका इमारतीत पीडित महिला आपल्या कुटुंबासह राहते. संशयित आरोपी गोकुळ चव्हाण (रा. मिथिला अपार्टमेंट, जळगाव) हा २५ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पीडितेच्या घरी ‘केवायसी’ची कागदपत्रे घेण्यासाठी गेला होता. यावेळी पीडितेने कागदपत्रे दिल्यानंतर, आरोपीने “मी तुमचे लाडकी बहीण योजनेचे काम करून देतो, पण मला तुमच्याशी एका विषयावर बोलायचे आहे” असे म्हटले. त्यानंतर त्याने पीडितेकडे अश्लील मागणी करत त्यांचा विनयभंग केला.

केवळ एवढ्यावरच न थांबता, संशयित आरोपी गोकुळ चव्हाण हा मार्च महिन्यापासून सातत्याने पीडितेच्या घराच्या आसपास घुटमळत होता. तो वारंवार घराच्या खिडकीतून आणि किचनच्या समोरून पीडितेकडे पाहत असे व तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. या त्रासाला कंटाळून अखेर पीडितेने जळगाव शहर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound