जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरात मध्यरात्री दोनदा पेट्रोल चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने फक्त एकदाच नव्हे, तर दोनदा या परिसरातील गाड्यांमधून पेट्रोल चोरले आणि गाडीचे लॉक तोडून मोठे नुकसान केले. ही घटना नागरिकांसाठी सतर्कतेचा इशारा ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ एप्रिल २०२६ रोजी पहिल्या चोरीची वेळ मध्यरात्री ०१:५३ मिनिटे होती. या वेळी चोरट्याने पार्किंगमधील गाडीचे पेट्रोल लॉक तोडून पेट्रोल चोरी केले. घटनास्थळी सीसीटीव्ही कॅमेर्यात हा चोरटा स्पष्टपणे कैद झाला असून तो अत्यंत निर्धास्त व धाडसी असल्याचे दिसत आहे.

तो पुन्हा ०२:०४ मिनिटांनंतर त्याच ठिकाणी परत आला आणि गाडीतील पेट्रोल दुसऱ्यांदा चोरी केले. या वेळीही त्याने लॉक कापले आणि गाडीचे नुकसान केले. या दोन्ही घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सदर व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, पोलिसांनी नागरिकांना अधिक सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. रामेश्वर कॉलनी व आसपासच्या परिसरातील रहिवाशांनी स्वतःच्या वाहनांची सुरक्षा वाढवावी, संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित पोलीस स्टेशनला कळवावे, किंवा पकडण्यास शक्य असेल तर पोलिसांच्या सहकार्याने कारवाई करावी.



