Home क्राईम किराणा दुकान फोडून लाखो रूपयांचा ऐवज लांबविला ; गुन्हा दाखल !

किराणा दुकान फोडून लाखो रूपयांचा ऐवज लांबविला ; गुन्हा दाखल !

0
119


धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । धरणगाव शहरात अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकानदाराचे बंद घर फोडून घरातून सुमारे १ लाख ९६ हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील संजय नगरात राहणारे लक्ष्मण हिरामण चौधरी हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. किराणा दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. २३ मार्च रोजीच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बंद घर फोडले. चोरट्यांनी दुकानातून ५८ हजार ४०० रूपयांचे पैजण, ३३ हजारांचे चांदीचे जोडवे, १ लाख ५ हजाराचे दागिने असा एकुण १ लाख ९६ हजार ४०० रूपयांचा ऐवज लांबविला. ही घटना समोर आल्यानंतर लक्ष्मण चौधरी यांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार हे करीत आहे.


Protected Content

Play sound