Home Cities जळगाव सायबर सुरक्षा व करिअर मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवी दिशा

सायबर सुरक्षा व करिअर मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नवी दिशा


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, जळगाव येथे “DIPEX Talk 2K26” हा मार्गदर्शनपर कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आयोजित या उपक्रमाला विद्यार्थी व प्राध्यापकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गोदावरी फाउंडेशनच्या अंतर्गत चालणाऱ्या आणि स्वायत्त तसेच NAAC मानांकित असलेल्या या महाविद्यालयात 30 मार्च 2026 रोजी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अनुशासित व प्रगतशील विद्यार्थी संघटना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. वरुणराज नन्नवरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, विद्यार्थी संघटनांमुळे नेतृत्वगुण, सामाजिक बांधिलकी आणि संघभावना विकसित होण्यास मोठी मदत होते.

कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री. कल्याण दाणी यांनी विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षा, माहिती तंत्रज्ञानातील बदलते ट्रेंड आणि आधुनिक करिअरच्या संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डिजिटल युगात सायबर सुरक्षेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा सकारात्मक वापर करून आपल्या करिअरची योग्य दिशा ठरवावी, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नव्या संधींबाबत सखोल माहिती मिळाली.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी भूषविले. त्यांनी विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत कौशल्यविकासाचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी महाविद्यालयातील विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक यांचीही मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. प्रा. डॉ. हेमंत इंगळे, प्रा. दीपक झांबरे, प्रा. नितीन पाटील, प्रा. अमिता महाजन, प्रा. नीलिमा पाटील, प्रा. प्रसाद मराठे, प्रा. राजश्री खडके, प्रा. लीना चौधरी, प्रा. रोहिणी डवले आणि प्रा. दीपेश भुसे यांच्यासह अनेक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन विद्यार्थी परिषद प्रतिनिधी प्रणव कंवर, यश बोंडे, मोहित चौधरी आणि रोहित कोळी यांनी केले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन वैष्णवी चौधरी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रतीक्षा सोनवणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्य डॉ. केतकी पाटील तसेच डॉ. वैभव पाटील आणि डॉ. अनिकेत पाटील यांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.


Protected Content

Play sound