यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे.टी. महाजन स्कूलमध्ये दिनांक ३० मार्च २०२६ रोजी वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण वर्षभर शाळेच्या वतीने आयोजित विविध स्पर्धा, चर्चासत्रे, क्रीडा स्पर्धा आणि विज्ञान प्रदर्शनामधून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांचा यावेळी गौरव करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या सौ. रंजना महाजन या होत्या. त्यांच्या हस्ते विविध उपक्रमांतील विजेत्या विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्रे आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. वर्षभर घेतलेल्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी दाखवलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करत प्राचार्या रंजना महाजन यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी प्रेरणा दिली.
कार्यक्रमात इंग्लिश मिडियम विभागाच्या प्राचार्या दिपाली धांडे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे आणि गौरी भिरूड यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सरोज येवले यांनी प्रभावीपणे केले. संपूर्ण वातावरण आनंददायी आणि उत्साहपूर्ण होते. विद्यार्थ्यांच्या यशाचा हा सोहळा शाळेसाठी अभिमानाचा ठरला.



