Home क्राईम भीषण अपघात; जखमी झालेल्या तरूणाचा दुदैवी मृत्यू !

भीषण अपघात; जखमी झालेल्या तरूणाचा दुदैवी मृत्यू !


चोपडा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा शहरातील प्रताप हायस्कूलजवळ झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या १६ वर्षीय उत्कर्ष दिलीप पाटील या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे बोरोले नगर परिसर आणि चोपडा शहरात मोठी शोककळा पसरली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्कर्ष दिलीप पाटील (वय १६, रा. बोरोले नगर ६, चोपडा) याचा २६ मार्च रोजी प्रताप हायस्कूल जवळील रस्त्यावर अपघात झाला होता. या अपघातात तो गंभीर जखमी झाल्याने त्याला तात्काळ जळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जळगाव येथे नेत असतांना उत्कर्षची शरीरातील हालचाल बंद झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्याला तातडीने चोपडा उपजिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी नेले असता, ड्युटीवर असलेल्या सी.एम.ओ. डॉ. सपना पाटील यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याबाबत चोपडा शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज वाळुंज हे करीत आहे.


Protected Content

Play sound