Home क्राईम भररस्त्यात तरुणीची अडवणूक करून शिवीगाळ ; जीवे मारण्याची धमकी !

भररस्त्यात तरुणीची अडवणूक करून शिवीगाळ ; जीवे मारण्याची धमकी !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील आव्हाणा परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षण घेण्यासाठी क्लासला जाणाऱ्या १८ वर्षीय तरुणीची भररस्त्यात अडवणूक करून तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “तू जर माझ्याशी बोलली नाहीस, तर तुला जिवंत सोडणार नाही,” अशा शब्दांत संबंधित तरुणाने तरुणीला धमकावल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

जळगाव तालुक्यातील आव्हाणे गावातील एका भागात अठरा वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २७ मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारात पिडीत तरूणीही क्लासला जात होती. त्यावळी गावातील संशयित आरोपी पंकज पाटील याने तरूणीचा रस्ता आडविला. आणि काहीही कारण नसतांना तिला शिवीगाळ करून लागला. त्यासनंतर तू जर माझ्याशी बोलली नाही तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या घटनेनंतर तरूणीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून याबाबत तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी पंकज पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्यामकुमार मोरे हे करत आहेत.


Protected Content

Play sound