यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेनुसार शेतकऱ्यांच्या हितासाठी नाफेडचे हरभरा खरेदी केंद्र यावलचा शुभारंभ यावल कृषी उत्पन्न बाजार समीती येथील कृषी मित्र हरीभाऊ जावळे गोदाम येथे पार पडला.
याप्रसंगी काटा पूजन व धान्य पूजन रावेर यावल विधानसभेचे आमदार अमोल हरिभाऊ जावळे व आमदार प्रा.चद्रकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हरभरा खरेदी केंद्रास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी विक्रीसाठी प्रथम आलेले शेतकरी गुलाब भगवान महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रथम केंद्रावर धान्य विक्री करता आणलेल्या शेतकऱ्याचा बाजार समीती सभापती उजैनसिंह राजपुत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सदर केंद्र कोरपावली वि.का.सोसायटीचे चेअरमन राकेश वसंत फेगडे व सर्व संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाले आहे. यावेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उज्जेनसिंग राजपूत,बाजार समिती उपसभापती दिपक चौधरी, संचालक हर्षल पाटील,सचीव स्वप्नील सोनवणे, शेतकी संघ संचालक तेजस पाटील, कोरपावली सोसायटीचे संचालक मंडळ तथा सचिव मुकुंदा तायडे यांसह तालुक्यातील पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.



