Home क्राईम निवृत्त पोलीस निरीक्षकाचे बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला !

निवृत्त पोलीस निरीक्षकाचे बंद घर फोडून अडीच लाखांचा ऐवज लांबविला !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरालगत असलेल्या निमखेडी रोडवरील स्वामी पार्क परिसरात एका निवृत्त पोलीस निरीक्षकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लांबवल्याची धक्कादायक घटना सोमवारी २३ मार्च रोजी सकाळी साडेसात वाजता उघडकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मिळालेल्या माहितीनुसार, निमखेडी येथील स्वामी पार्क येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मगन वनाजी मेहेते (वय-६२) यांचे घर २२ मार्च रोजी सकाळी ११ ते २३ मार्च रोजी सकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान बंद होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २ लाख ४० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.

घटनेची माहिती मिळताच जळगाव तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी मगन मेहेते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनि अनंत अहिरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.


Protected Content

Play sound