Home आरोग्य डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात तिरळेपणा शस्त्रक्रियेचे मोफत मेगा शिबिर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तिरळेपणा आणि पडलेली पापणी या डोळ्यांच्या समस्यांवर उपचारासाठी मोठ्या शहरांकडे धाव घेण्याची गरज आता उरलेली नाही. जळगावातच तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत तपासणी आणि शस्त्रक्रियेचे मेगा शिबिर आयोजन डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे करण्यात आले असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जळगाव खुर्द येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दि. ३, ४ आणि ५ एप्रिल दरम्यान हे विशेष शिबिर पार पडणार आहे. या शिबिरात तिरळेपणा तसेच पडलेल्या पापणीच्या रुग्णांची सखोल तपासणी करून आवश्यकतेनुसार मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मर्यादित स्वरूपात फक्त १०० रुग्णांसाठी ही सुविधा उपलब्ध असल्याने इच्छुकांनी लवकर नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या शिबिरासाठी पुण्याचे प्रख्यात नेत्ररोग तज्ञ डॉ. मधुसूदन झंवर विशेष उपस्थित राहणार आहेत. तिरळेपणा शस्त्रक्रियेत त्यांना तीन दशकांहून अधिक अनुभव असून त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागात आतापर्यंत १९८ यशस्वी नेत्रशिबिरे आयोजित केली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २० तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या शिबिरात सहभागी होणार असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत.

जिल्ह्यातील अनेक रुग्ण आर्थिक अडचणींमुळे मोठ्या शहरात उपचार घेऊ शकत नाहीत. अशा रुग्णांसाठी हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. स्थानिक पातळीवर उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत असल्यामुळे रुग्णांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत.


Protected Content

Play sound