धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील साळवा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा परवानगी न घेता उभारण्यात आल्याची घटना घडली असून या प्रकरणी तब्बल सतरा स्त्री-पुरूषांसह जमावावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
धरणगाव तालुक्यातील साळवा गावातील झेंडा चौकात रातोरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात आल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली होती. याची माहिती मिळताच महसूल व पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. यात प्रामुख्याने तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी, डीवायएसपी अण्णासाहेब घोलप, पोलीस निरिक्षक सुनील पवार,नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते, गटविकास अधिकारी अशोक वानखेडे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश होता. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने या पुतळ्यासाठी ठिय्या मांडून बसलेल्या महिला आणि पुरूषांना समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला. तथापि, यात यश न आल्याने सायंकाळी त्यांना ताब्यात घेण्यात आले. तर रात्री उशीरा धरणगाव पोलीस स्थानकात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांमध्ये (1)ओकांर जनार्दन पाटील वय 38,(2)लिलाधर अर्जुन पाटील वय 40, (3)दिपक धनराज पाटील वय 32,(4)शंकर जनार्दन पाटील वय 42, (5)खुशाल चंद्रशेखर पाटील वय 25,(6)अविनाश विश्वास पाटील वय 43, (7)अर्जुन यादव पाटील वय 70,(8)लिलाधर बाबुराव पाटील वय 66, (9)हर्षल दिलीप पाटील वय 19,(10)वसंत गणपत पाटील वय 29, (11)खंडेराव अर्जुन पाटील वय 42,(12)देवेद्र श्रीराम पाटील वय 40, (13)वासुदेव गणपत पाटील वय 42,(14)दिपाली ओकांर पाटील वय 29, (15)लिलाधर अर्जुन पाटील यांची पत्नी,(16)शंकर जनार्दन पाटील यांची पृत्नी,(17)वासुदेव गणपत पाटील यांची पत्नी यांच्यासह तेथे उपस्थित असलेल्या जमावाचा समावेश करण्यात आलेला आहे.
या सर्व संशयितांच्या विरोधात धरणगाव पोलीस स्थानकामध्ये सिसिटीएनएस भाग – 5 गुरनं. 70/2026 भारतीय न्याय.संहीता-कलम 49,61,132,189(1)(2)(3)(5),35 1(2)(3),221,223,226.329(3) यांच्यासह सहसार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण अधिनियम कलम 3 तसेच व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37(1)(3) चे उल्लधंन 135 प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. पुढील तपास धरणगाव येथील पोलीस निरिक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक संतोष पवार हे करीत आहेत.
दरम्यान, आता या प्रकरणी प्रशासन पुढे काय भूमिका घेणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



