Home Cities एरंडोल एरंडोल तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

एरंडोल तालुक्यातून अल्पवयीन मुलीचे अपहरण; गुन्हा दाखल

0
168


एरंडोल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल तालुक्यातील एका गावात राहणारी सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना शनीवारी २१ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील एका गावात सतरा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. शनीवारी २१ मार्च रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीचे नातेवाईक हे घरात सर्वजण झोपलेले असतांना अज्ञात व्यक्तीने पिडीत मुलीला काहीतरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेले. हा प्रकार समोर आल्यानंतर नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर तिच्या पालकांनी एरंडोल पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास देशमुख हे करीत आहे.


Protected Content

Play sound