Home क्राईम सत्यम पार्कमध्ये चोरी : दीड लाखांचा ऐवज लांबविला !

सत्यम पार्कमध्ये चोरी : दीड लाखांचा ऐवज लांबविला !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल शहरात घरफोडीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सत्यम पार्क परिसरात भरदिवसा चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याबाबत जळगाव तालुक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सागर राजेंद्र जगताप (वय ३२, रा. सत्यम पार्क, आव्हाणे शिवार, जळगाव) हे आपल्या कामात व्यस्त असताना, २० मार्च रोजी दुपारी १ ते २१ मार्च च्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. फिर्यादीच्या गैरहजेरीत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला.

चोरट्यांनी घरातून १ लाखांची रोड आणि ४७ हजार रूपये किंतीचे दागिने असा एकुण १ लाख ४७ हजारांचा ऐवज लांबविल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी सागर जगताप यांच्या फिर्यादीवरून जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करत आहेत.


Protected Content

Play sound