Home Cities मुक्ताईनगर युनिक शाळेत आगळावेगळा ‘युनिक’ निरोप समारंभ उत्साहात !

युनिक शाळेत आगळावेगळा ‘युनिक’ निरोप समारंभ उत्साहात !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शालेय जीवनातील पहिल्या टप्प्याचा निरोप घेताना बालमनावर संस्कारांची शिदोरी आणि आनंदाच्या आठवणी कोरल्या जाव्यात, या उद्देशाने येथील ‘युनिक’ शाळेत यूकेजीच्या विद्यार्थ्यांसाठी एक आगळावेगळा आणि ‘युनिक’ निरोप समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

भव्य गार्डनमध्ये रंगला सोहळा:
हरताळे येथील एका निसर्गरम्य आणि भव्य दिव्य गार्डनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वर्गाच्या चार भिंतींच्या बाहेर, निसर्गाच्या सानिध्यात चिमुकल्यांनी खेळत-खेळत या निरोप समारंभाचा आनंद लुटला. एरव्ही निरोप समारंभ म्हटलं की डोळ्यात पाणी आणि मनावर दडपण असते, मात्र येथे मुला-मुलींनी विविध खेळांमध्ये सहभागी होत हा सोहळा अविस्मरणीय केला.

निरागस भावना आणि आठवणींचा प्रवास:
कार्यक्रमादरम्यान चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तोडक्या-मोडक्या पण निरागस शब्दांत त्यांनी शाळेतील मित्र, शिक्षक आणि आवडीच्या खेळांच्या आठवणींना उजाळा दिला. मुलांच्या या प्रांजळ भावनांनी उपस्थित पालकांचे आणि शिक्षकांचे मन जिंकून घेतले.

कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मात्र वातावरण काहीसे भावूक झाले होते. शाळेचे संस्थापक अध्यक्ष मासुळे सर आणि मासुळे मॅम यांच्यासह सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पुढील शालेय प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. जड अंतःकरणाने आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना निरोप देताना शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. पारंपारिक पद्धतीला फाटा देऊन, निसर्गाच्या सानिध्यात आणि मुक्त वातावरणात अशा प्रकारे निरोप समारंभ घेतल्याबद्दल पालकांनी शाळेचे भरभरून कौतुक केले.


Protected Content

Play sound