Home Cities जळगाव जागतिक चिमणी दिनानिमित्त जळगावात ४०० परळांचे वाटप  

जागतिक चिमणी दिनानिमित्त जळगावात ४०० परळांचे वाटप  


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक चिमणी दिनाच्या निमित्ताने जळगाव शहरात पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने काव्यरत्नावली चौकात तब्बल ४०० परळांचे (पक्ष्यांसाठी पाणी ठेवण्याची भांडी) वाटप करण्यात आले. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे पक्ष्यांना पाण्याची कमतरता भासत असल्याने या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना आपल्या घराजवळ, गच्चीवर किंवा अंगणात परळ ठेवून चिमण्यांसह इतर पक्ष्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन करण्यात आले. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याची उपलब्धता वाढवून पक्ष्यांचे प्राण वाचवणे ही काळाची गरज असल्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

कार्यक्रमात आमदार सुरेश भोळे यांनी मनोगत व्यक्त करत चिमण्यांचे पर्यावरणातील महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, चिमण्या केवळ पक्षी नसून पर्यावरणाच्या संतुलनासाठी अत्यंत आवश्यक घटक आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी समाजाने सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या उपक्रमाला संस्थेच्या अध्यक्षा मनीषा पाटील, ग्रीन सिटी फाउंडेशनचे अध्यक्ष विजय वाणी, निसर्ग मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, लेफ्टनंट प्रा. शिवराज पाटील, नगरसेवक नितीन बरडे, सदस्य डॉ. विनोद बाविस्कर तसेच वंदना मंडावरे, आशा मौर्य, रेणुका हिंगू, माधुरी शिंपी, हर्षा गुजराथी, नेहा जगताप, राधिका पाटील, स्मिता पाटील, पूजा हिंगू, पूर्वी शाह, जानवी जगताप, गौरव वनरा, किशोर पाटील यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. “पाणी ठेवा, चिमण्या वाचवा” असा संदेश देत सर्वांनी पर्यावरण संवर्धनाचा जागर केला.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये पक्षी संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण झाली असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम राबविण्याचा मानस संस्थेने व्यक्त केला आहे. शहरात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम पर्यावरणासाठी महत्त्वाचा ठरत असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.


Protected Content

Play sound