Home आरोग्य महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’; रुग्णाच्या हस्ते अनोख्या पद्धतीने गुढीपूजन

महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’; रुग्णाच्या हस्ते अनोख्या पद्धतीने गुढीपूजन

0
108


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील प्रसिद्ध महादेव हॉस्पिटलमध्ये ‘आरोग्याची गुढी’ हा अनोखा आणि समाजोपयोगी उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सणाच्या निमित्ताने केवळ परंपरा जपण्यापुरते न थांबता, नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, कोणत्याही मान्यवराऐवजी रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या एका रुग्णाच्या हस्ते विधीवत गुढी उभारण्यात आली. या कृतीतून ‘रुग्णसेवा हाच खरा धर्म’ हा संदेश अधोरेखित करण्यात आला. गुढी उभारल्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांशी थेट संवाद साधत विविध आरोग्यविषयक मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.

डॉक्टरांनी यावेळी नियमित आरोग्य तपासणीचे महत्त्व अधोरेखित करत आजार वाढण्यापूर्वीच त्याचे निदान करण्याची गरज स्पष्ट केली. बदलत्या ऋतूंमध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि मानसिक आरोग्य यांचा योग्य समतोल राखणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच सण-उत्सवाच्या काळात सकारात्मक दृष्टिकोन ठेवून निरोगी जीवनशैली अंगीकारल्यास अनेक आजारांपासून दूर राहता येते, असा मोलाचा सल्लाही देण्यात आला.

या कार्यक्रमाला महादेव हॉस्पिटलमधील विविध विभागांचे तज्ज्ञ डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना नववर्षाच्या आरोग्यपूर्ण शुभेच्छा देत निरोगी जीवन जगण्याचे आवाहन केले.


Protected Content

Play sound