एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एरंडोल येथील मशिद अली वाडा परिसरात घराच्या खरेदी-विक्रीच्या कारणावरून दोन गटांत जोरदार राडा झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी लाकडी काठ्या आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली असून, एरंडोल पोलीस स्थानकात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दाऊद शेख अलीमोद्दीन (वय ४८, रा. मशिद अली वाडा) यांनी सैय्यद सत्तार अकबर यांच्याकडून एक घर खरेदी केले होते. याच घर खरेदीच्या कारणावरून मंगळवारी १७ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास, शेख शकील शेख लतीफ, सहिदा बी शेख लतीफ, शबाना बी शेख लतीफ, शफिक शेख लतीफ आणि अकील शेख लतीफ यांनी अरशद शेख युनूस आणि आवेश युनूस शेख यांना हातातील लाकडी काठ्यांनी तसेच लाथाबुक्क्यांनी हातापायावर बेदम मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर दाऊद शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून एरंडोल पोलिसांनी शेख शकील शेख लतीफ, सहिदा बी शेख लतीफ, शबाना बी शेख लतीफ, शफिक शेख लतीफ आणि अकील शेख लतीफ अशा एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड हे करीत आहे.



