Home क्राईम पीक विमा घोटाळा : रावेर पाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यातील पाच सीएससी सेंटर चालकांवर...

पीक विमा घोटाळा : रावेर पाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यातील पाच सीएससी सेंटर चालकांवर गुन्हा दाखल


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | सध्या गाजत असलेल्या पीक विमा घोटाळ्याचे मुक्ताईनगर तालुका कनेक्शन देखील समोर आले असून शासनाची तब्बल सहा कोटी 65 लाख रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पाच सीएससी सेंटर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने परिसरात एकच खळबख उडाली आहे.

जळगाव जिल्ह्यात सीएससी सेंटर चालकांनी काही जणांशी संगनमत करून पीक विम्यात मोठा डल्ला मारल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी काल रावेर तालुक्यातील चार सीएससी चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या पाठोपाठ मुक्ताईनगर तालुक्यात देखील मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात मंडळ कृषी अधिकारी प्रथमेश थोरात यांनी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात फिर्याद दिली. यानुसार, पाच सीएससी चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये निलेश शांताराम पाटील ( रा. उचंदे, ता. मुक्ताईनगर ); अनिरूध्द तुकाराम अहिरे रा. मुक्ताईनगर; चिरायू भुवनेश्वर चौधरी रा. मुक्ताईनगर; विजय रामदास पाटील रा. अंतुर्ली आणि डिगंबर सुकदेव चौधरी रा. कर्की या पाच जणांचा समावेश आहे. या पाचही जणांनी पीक विम्याचा गैरफायदा घ्यावा यासाठी राज्य शासनाची 3,78,39,452 रूपये तर केंद्र शासनाची 2,86,66,252 रूपये अशी तब्बल 6 कोटी 65 लाख पाच हजार सातशे चार रूपयांची फसवणूक केल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.

या पाचही जणांच्या विरूध्द मुक्ताईनगर पोलीस स्थानकात बीएनएस कलम 316 (2) आणि 318 (4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुक्ताईनगर पोलीस करत आहेत.


Previous articleशहरी भारतात ‘नो किड्स’ला ट्रेंडची झपाट्याने होतेय वाढ
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound