Home क्राईम भुसावळ शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !

भुसावळ शहरातून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले !


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील प्रीमियर हॉटेल परिसरात ही घटना सोमवारी, ९ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १६ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबासह भुसावळ शहरातील प्रीमियर हॉटेलच्या बाजूला राहणाऱ्या नातेवाईकांकडे काही कामानिमित्त आली होती. सोमवारी सायंकाळी सर्वजण घरात असताना, सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ही मुलगी अचानक बेपत्ता झाली. कुटुंबीयांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कोठेही मिळून आली नाही. तपासादरम्यान असे समोर आले की, संशयित आरोपी अश्विन दीपक सोनवणे (रा. भुसावळ) याने पीडित मुलीला काहीतरी आमिष दाखवून किंवा फुस लावून स्वतःसोबत पळवून नेले आहे. पीडित मुलीच्या आईने या संदर्भात संशय व्यक्त करत पोलिसांत धाव घेतली. मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अश्विन सोनवणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल गणेश चौधरी हे करीत आहेत.


Protected Content

Play sound