Home क्राईम शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल

शेतात काम करणाऱ्या महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा दाखल


पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शेतात एकटीने काम करणाऱ्या एका ४८ वर्षीय महिलेचा विनयभंग करून तिला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना भोलाणे शिवारामध्ये घडली आहे. याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मोहन कौतिक भिल (रा. भोलाणे, ता. पारोळा) याच्याविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात ४८ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. शेती काम करून उदरनिर्वाह करतात. दरम्यान ८ मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या शेतात काम करत असताना, संशयित आरोपी मोहन भिल तिथे आला. त्याने महिलेच्या पाठीमागून येऊन अश्लील वक्तव्य केले. “तू मला एकटी भेटली आहेस, मी तुला सोडणार नाही,” असे म्हणत त्याने पीडितेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला.

महिलेने प्रसंगावधान राखून आरोपीला प्रतिकार केला आणि त्याला ढकलून दिले. याचा राग आल्याने आरोपीने पीडितेच्या साडीचा पदर जोरात ओढला. यामुळे साडीचा फास गळ्याभोवती आवळला जाऊन महिला जमिनीवर पडली. इतक्यावरच न थांबता, आरोपीने पीडितेच्या तोंडावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी गंभीर मारहाण केली. तसेच, नखांनी ओरबाडून तिला दुखापत केली आणि विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत महिलेने पारोळा पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल दुकळे हे करीत आहे.


Protected Content

Play sound