Home महिला मुक्ताईनगरात महिला दिनानिमित्त मॅरथॉन स्पर्धा : महिला मोठा सहभाग !

मुक्ताईनगरात महिला दिनानिमित्त मॅरथॉन स्पर्धा : महिला मोठा सहभाग !


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयाच्या वतीने भव्य ‘महिला मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मुक्ताईनगर शहराच्या इतिहासात प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात आल्याने या ऐतिहासिक सोहळ्याला महिलांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.

उत्साहवर्धक उद्घाटन आणि मार्गदर्शन :
स्पर्धेचे उद्घाटन मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. रोहिणीताई खडसे-खेवलकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आले. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, “आपण जिजाऊ, अहिल्यादेवी आणि सावित्रीच्या लेकी आहोत. उद्याच्या भारताच्या इंदिरा गांधी आणि कल्पना चावला तुमच्यातूनच घडणार आहेत. आरोग्य आणि यश एकाच नाण्याच्या दोन बाजू असून महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ काढणे गरजेचे आहे.”

स्पर्धेचा निकाल आणि पारितोषिके :
दोन वयोगटांत झालेल्या या स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
३० वर्षांखालील गट: प्रथम – कु. दीपाली रमेश पाटील, द्वितीय – जयश्री माधव गुंड, तृतीय – प्राजक्ता बाळू भालशंकर.
३० वर्षांवरील गट: प्रथम – सुवर्णा कैलास पाटील, द्वितीय – पुनम वैभव पाटील, तृतीय – सोनाली विजय वाघ.

नियोजन आणि सहकार्य :
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हेमंत महाजन, उपप्राचार्य डॉ. संजीव साळवे आणि उपप्राचार्या वंदना चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व क्रीडा विभागाने या स्पर्धेचे नेटके आयोजन केले होते. या स्पर्धेला ‘शिव इन्व्हेस्टमेंट’, ‘पूजा साडी सेंटर’ आणि ‘अंजली मेडिकल’ यांचे प्रायोजकत्व लाभले. तसेच पोलीस व आरोग्य विभागाने विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा संचालक डॉ. प्रतिभा ढाके यांनी केले, तर आभार डॉ. विजय डांगे यांनी मानले.


Protected Content

Play sound