Home क्राईम कृषी केंद्रातून ५० हजारांची रोख रक्कम लंपास; अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल

कृषी केंद्रातून ५० हजारांची रोख रक्कम लंपास; अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल


रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर शहरातील पाल गावातील एका नामांकित कृषी केंद्रात भरदिवसा चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तीन अनोळखी इसमांनी संगनमताने ‘दिक्षा कृषी केंद्रा’च्या काउंटरमधील ड्रॉवरमधून ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी बुधवारी ५ मार्च रोजी रावेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाल गावातील रहिवासी गणेश मानसिंग पवार (वय-३३) यांचे ‘दिक्षा कृषी केंद्र’ नावाचे दुकान आहे. २८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास गणेश पवार त्यांच्या दुकानात असताना तीन अनोळखी इसम तिथे आले. या तिघांनी फिर्यादीचे लक्ष विचलित केले.

संधी मिळताच, काउंटरच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेल्या १ लाख रुपयांच्या एकूण रकमेपैकी ५० हजारांची रोकड चोरून नेली. चोरीची ही बाब लक्षात आल्यानंतर गणेश पवार यांनी रावेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यानुसार रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल जगदीश पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound