Home क्राईम धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक !

धक्कादायक : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक !

0
163


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील एका भागात राहणाऱ्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बुधवारी ४ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून नराधमाला अटक करण्यात आली आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात बारा वर्षीय अल्पवयीन मुलगी ही वास्तव्याला आहे. दरम्यान संशयित आरोपी संदीप बळीराम तायडे रा. चिंचोली ता. जळगाव याने २ मार्च रोजी दुपारी १२.३० वाजता पिडीत मुलीशी गोडबोलून जवळीक साधली आणि तिच्यासोबत अश्लिल वर्तन केले.

त्यानंतर तिला शाळेत सोडण्याच्या निमित्ताने घरून घेवून नशिराबाद भुसावळ रोडकडे घेवून जावून एका झोपडीत तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पिडीत मुलीने हा प्रकार तिच्या पालकांना सांगितला. त्यानुसार तिचे पालक यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार नराधम संदीप तायडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे हे करीत आहे.


Protected Content

Play sound