Home क्राईम जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला दोघांकडून मारहाण

जुन्या भांडणाच्या कारणावरून तरूणाला दोघांकडून मारहाण


भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जुन्या भांडणाच्या कारणावरून भुसावळ शहरातील आंबेडकर नगरात एका तरूणाला बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याबाबत रात्री १० वाजता भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, भुसावळ शहरातील न्यू आंबेडकर नगरात आतीष रविंद्र खरात वय २९ हा तरूण वास्तव्याला आहे. मंगळवारी ३ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता जुन्या भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपी आदित्य उर्फ पायलेट संजय लोखंडे आणि सनी संजय लोखंडे दोन्ही रा. जुन आंबेडकर नगर, भुसावळ यांनी आतिष खरात याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात मारहाण करणारे आदित्य उर्फ पायलेट संजय लोखंडे आणि सनी संजय लोखंडे दोन्ही रा. जुन आंबेडकर नगर, भुसावळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार युनूस शेख हे करीत आहे.


Protected Content

Play sound