
चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील हातेड गावात मिरवणूकीत कोणता डी.जे. लावावा या कारणावरून दोन भावडांना गावातील दोन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तून बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २ मार्च रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समाधान गोकूळ शिरसाठ वय ४० रा. हातेड खुर्द ता. चोपडा हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान मिरवणूकीत कोणता डी.जे. लावावा यावर गावातील काही तरूणांची चर्चा सुरू होती. याच कारणावरून समाधान शिरसाळ व त्याचा भाऊ यांना गावात राहणारा भारत सुनिल शिरसाठ आणि प्रमोद सुनिल शिरसाठ यांनी शिवीगाळ करत दोन्ही भावांना लोखंडी वस्तूने मारहाण करून गंभीर दुखापत केली. हा प्रकार घडल्यानंतर समाधान शिरसाठ यांनी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून मारहाण करणारे भारत सुनिल शिरसाठ आणि प्रमोद सुनिल शिरसाठ या दोघांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक संदीप नन्नवरे हे करीत आहे.



