
जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील निवृत्ती नगर परिसरात नातेवाईक असलेल्या एका अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करत सव्वा लाखांहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील निवृत्ती नगरात लताबाई पंडित सपकाळे वय ५३ या महिला आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी ३ ते ७ फेब्रुवारी दरम्यान नातेवाईक असलेल्या अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घरातून सव्वा लाख रूपये किंमतीचे दागिने चोरून नेल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर लताबाई सपकाळे यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस अंमलदार अनिता वाघमारे या करत आहेत.



