Home क्राईम मेहरूणमध्ये जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी !

मेहरूणमध्ये जुन्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी !

(घटनेनंतर परिसरात झालेली गर्दी !)


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मेहरूण परिसरातील साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर किरकोळ दगडफेक देखील झाली. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यापैकी भाजपाचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जळगाव शहरातील मेहरूण परिसरात धुलिवंदनाच्या दिवशी गालबोट लागले आहे. साईबाबा मंदिर चौकात जुन्या वादातून दोन गटात हाणामारीची घटना घडली. त्यानंतर किरकोळ दगडफेक देखील झाली. यात घराच्या गेटची तोडफोडही करण्यात आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावाला पांगविले. घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, एमआयडीसी पोलिस ठाण्याबाहेर दोन्ही गटातील नागरिकांचा जमाव जमल्याने दंगा नियंत्रण पथकही तैनात करण्यात आले. पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले असून, दोन्ही गटांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

दरम्यान पोलिसांनी दगडफेक झाली नसून जुन्या वादातून किरकोळ वाद झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यापैकी भाजपाचे नगरसेवक सुनील महाजन यांचे बंधू भरत महाजन यांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आता परिस्थिती नियंत्रणात आहे.


Protected Content

Play sound