Home Cities जळगाव मेहरुण येथे प्रभू श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचा पर्यावरणपूरक होळी उपक्रम

मेहरुण येथे प्रभू श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघाचा पर्यावरणपूरक होळी उपक्रम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेहरुण येथे “प्रभू श्रीराम ज्येष्ठ नागरिक संघा”तर्फे मंगळवार, दिनांक ३ मार्च २०२६ रोजी होळीच्या निमित्ताने पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त उपक्रम राबविण्यात आला. संघाच्या स्थापनेनंतरचा हा पहिलाच सामाजिक संदेश देणारा उपक्रम ठरला.

रंगपंचमी महोत्सवानिमित्त उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी नैसर्गिक रंगांची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. रासायनिक व हानिकारक केमिकलयुक्त रंगांमुळे त्वचेला इजा होऊ शकते तसेच विद्रूपता येऊ शकते, याची जाणीव करून देत “नैसर्गिक रंगांची होळी साजरी करा” हा संदेश समाजात पोहोचविण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.

या उपक्रमाला अध्यक्ष दिलीप लाडवंजारी, उपाध्यक्ष सोमनाथ सानप, खजिनदार उत्तमराव नेरकर यांच्यासह सदस्य सर्वश्री रमेश सानप, रामदास जाधव, अशोक वाघ, दिलीप बडगुजर, भास्कर वाणी, दत्तात्रेय लाडवंजारी, प्रकाश घुगे, भास्कर महाजन आदी सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भूषण लाडवंजारी यांनी बहुमोल सहकार्य केले. पर्यावरण संरक्षणाचा संदेश देत ज्येष्ठ नागरिकांनी साजरी केलेली ही नैसर्गिक रंगांची होळी मेहरुण परिसरात विशेष चर्चेचा विषय ठरली.


Protected Content

Play sound