Home Cities जळगाव सी.ए. फायनलचा निकाल जाहीर

सी.ए. फायनलचा निकाल जाहीर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आयसीएआयतर्फे जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या सी.ए. फायनल परीक्षेचा निकाल १ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. देशभरातील विद्यार्थ्यांनी या परीक्षेस मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.

देशभरातील निकालानुसार, ग्रुप १ साठी ५३ हजार ६५२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी ११ हजार २८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रुप २ साठी ३८ हजार १६९ विद्यार्थ्यांपैकी ३ हजार ७२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दोन्ही ग्रुपसाठी २२ हजार २९३ विद्यार्थ्यांपैकी २ हजार ४४६ विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

नवीन अभ्यासक्रमातून कर्नाल येथील दीक्षा गोयल हिने प्रथम क्रमांक पटकावला असून पौन्ता साहिब येथील अनिरुद्ध गर्ग द्वितीय तर नवी दिल्ली येथील ऋषभ जैन तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.

जळगाव शहरातील निकालाकडे पाहता, ग्रुप १ साठी ७४ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ग्रुप २ साठी २९ विद्यार्थ्यांपैकी १ विद्यार्थी उत्तीर्ण झाला. दोन्ही ग्रुपमधून ५ विद्यार्थी पहिला ग्रुप, १ विद्यार्थी दुसरा ग्रुप तर १२ विद्यार्थी दोन्ही ग्रुप उत्तीर्ण झाले आहेत.

जळगाव शहरातून दोन्ही ग्रुपमध्ये पियुष राजेश झवर प्रथम, चेतन रामदास पाटील द्वितीय तर अनिकेत मनोज मित्तल तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले.

याप्रसंगी जळगाव सी.ए. शाखेचे अध्यक्ष सी.ए. हितेश आगीवाल यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून वाणिज्य क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी सी.ए. क्षेत्राची निवड करावी, असे आवाहन केले. विकसित भारत २०४७च्या ध्येयपूर्तीसाठी देशाला मोठ्या संख्येने चार्टर्ड अकाउंटंट्सची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.


Previous articleमुक्ताईनगरातील महामार्गाचे काम ठप्प; शेतकरी आक्रमक
पत्रकारितेत १५ वर्षांचा अनुभव. मुद्रीत, इलेक्ट्रॉनिक आणि डिजीटल या तिन्ही माध्यमांमध्ये पारंगत. क्राईम आणि राजकीय स्टोरीज ही स्पेशालिटी. वृत्तासोबतच प्रतिमा आणि व्हिडीओ एडिटींगमध्येही कौशल्य ही अजून एक खासियत. लाईव्ह ट्रेंडस न्यूजमध्ये पहिल्या दिवसापासून कार्यरत असणारे जितेंद्र कोतवाल हे आता वृत्तसंपादक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. बातम्यांसाठी संपर्क : ९३७०४०३२००

Protected Content

Play sound