Home क्राईम जळगावात प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटले !

जळगावात प्रवाशाला चाकूचा धाक दाखवून लुटले !


जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहराजवळ प्रवासादरम्यान एका चालकाला चाकूचा धाक दाखवत ९ हजार ७०० रुपयांची लूट करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रविवारी 1 मार्च रोजी दुपारी तीन वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सलमान खान अमानुल्ला खान (वय ५२, रा. निंभोरा) हे २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता अजिंठा चौफुली परिसरातून प्रवास करत होते. यावेळी अज्ञात चार इसमांनी त्यांना १०० रुपये देण्याचे आमिष दाखवून वाहनात बसवले. काही अंतर गेल्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या कमरेला चाकू लावून धमकावले.

यानंतर वाहनातील इतर साथीदारांनी सलमान खान याला पकडून त्यांच्या खिशातील ९ हजार ७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. आणि त्यांना रस्त्यात उतरवून वाहनासह पळ काढला. या घटनेनंतर घाबरलेल्या फिर्यादीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound