Home Cities जळगाव पोषण आहारातून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकांंसह केंद्र प्रमुख निलंबित

पोषण आहारातून विषबाधा प्रकरणी मुख्याध्यापकांंसह केंद्र प्रमुख निलंबित

0
71

notice to the jalgaon zp ceo 20180588764

जळगाव, प्रतिनिधी | भुसावळ तालुक्यातील कन्हाळे गावात ९ विद्यार्थांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती. या संदर्भात जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांनी पोषण आहाराचे नमुने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मस्कर यांच्याकडे दिले होते. मस्कर यांनी पथक तयार करुन अहवाल मागविला असता अहवालानुसार आज जि.प.प्राथमिक विद्या मंदीर कन्हाळे या शाळेतील मुख्याध्यापक, केंद्र प्रमख यांना निलंबित तर पोषण अधिक्षकांच्या बदलीचे आदेश आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी काढले.

जिल्हा परिषद प्राथमिक विद्या मंदीर कन्हाळे ता.भुसावळ या शाळेत गेल्या काही दिवसापूर्वी ९ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाली होती. ही माहिती जि.प.सदस्या पल्लवी सावकारे यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली असता त्यांना अत्यंत नित्कृष्ट दर्जाचा पोषण आहार शाळेत आढळून आला. त्याचे नमूने घेत त्यांनी थेट सीईओंकडे तक्रार केली. त्यानुसार सीईओंनी गटशिक्षण अधिकारी भुसावळ येथील १ व शालेय पोषण अधिक्षक येथील १, जिल्हा परिषद जळगाव येथील १ अशा तीन पथकांना चौकशी समिती स्थापन केली होती. यानुसार आज भुसावळ तालुक्यातील ४२ शाळांमधील २० शाळांचे पोषण आहार नित्कृष्ठ दर्जाचा आढळून आले. यात कन्हाळे जि.प.शाळेतील मुख्याध्यापक वृंदा ओंकार पाटील व केंद्र प्रमुख रविंद्र तिडके या दोघांना निलंबनाचे आदेश तर शालेय पोषण अधिक्षक सुमित्र अहिरे यांच्या बदलीचे आदेश आज जारी केले. तर २० शाळेतील मुख्याध्यापक, केद्रप्रमुख व शालेय पोषण आहार अधिक्षक यांना नोटीस देवून त्यांना खुलासा सादर करुन शिस्तभंगाची कारवाई का करू नये अशी विचारणा सीईओ डॉ.बी.एन.पाटील यांनी केली आहे.


Protected Content

Play sound