Home Cities यावल जे.टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन उत्साहात 

जे.टी. महाजन इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन उत्साहात 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचालित J.T. Mahajan English Medium School, Yawalमध्ये मराठी राज्यभाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा करण्यात आला. मराठी भाषेच्या जतन आणि संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांद्वारे आपली कलागुणांची चमक दाखवली.

कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष सौ. रंजना महाजन यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली. यावेळी इंग्लिश माध्यमाच्या प्राचार्या श्रीमती दिपाली धांडे, सेमी माध्यमाच्या पर्यवेक्षिका राजश्री लोखंडे तसेच इंग्लिश माध्यमाच्या पर्यवेक्षिका गौरी भिरूड या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे वातावरण मराठी भाषेप्रती आदर आणि अभिमान व्यक्त करणारे होते.

शाळेच्या शिक्षिका अर्चना पाटील मॅडम आणि ऐश्वर्या पाटील यांनी विद्यार्थ्यांना प्रख्यात साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जीवनकार्याची सविस्तर माहिती दिली. मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या त्यांच्या योगदानाचा आढावा घेत विद्यार्थ्यांमध्ये भाषेप्रती अभिमानाची भावना जागृत करण्यात आली.

इयत्ता सहावी व सातवीच्या विद्यार्थ्यांनी नाट्यप्रयोग आणि गीतांच्या माध्यमातून आपले कला गुण सादर केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून मराठी भाषेविषयीची आत्मीयता आणि जिव्हाळा व्यक्त करत कार्यक्रमात भावनिक रंग भरला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधुरी भारंबे यांनी प्रभावीपणे केले, तर उपस्थितांचे आभार सुजाता पाटील यांनी मानले. शेवटी अध्यक्षीय भाषणात सौ. रंजना महाजन यांनी मराठी भाषेचे जतन आणि संवर्धन करण्याचे आवाहन करत विद्यार्थ्यांना मातृभाषेचा अभिमान बाळगण्याचा संदेश दिला. त्यांच्या भाषणानंतर मराठी राज्यभाषा गौरव दिनाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.


Protected Content

Play sound