चाळीसगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील जुने विमानतळ, मालेगाव रोड भागातील महिलेच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेल्याची घटना गुरूवारी २६ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता समोर आली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, अलका सुनील जाधव (वय ३९, रा. जुने विमानतळ, मालेगाव रोड, चाळीसगाव) या त्यांचे घर बंद करून गेल्या होत्या. २६ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे दरवाजाचे कुलूप तोडले. चोरट्यांनी घरात प्रवेश करून कपाटातील ६२ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रकमेवर डल्ला मारला.

घरमालक परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले आणि घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात त्यांनी धाव घेवून फिर्याद दिली आहे. याबाबत चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास अंमलदार दीपक जाधव हे करीत आहे.



