Home क्राईम दुकान काढण्याच्या किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण

दुकान काढण्याच्या किरकोळ कारणावरून एकाला बेदम मारहाण


धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याला लागून असलेली दुकानाची टपरी का काढत नाही, या कारणावरून झालेल्या वादात दुकानदाराला लाथाबुक्क्यांनी आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी २३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे घडली आहे. याप्रकरणी बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे प्रवीण मांगो पाटील (वय ४८) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याले आहे. त्यांचे गावातील रस्त्यालगत दुकान आहे. २३ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास मढीभागात संशयित आरोपी राजेंद्र बाळकृष्ण सावंत, दिगंबर बाळकृष्ण सावंत, विजय संजय सावंत आणि चंद्रभान भागवत कोळी (सर्व रा. चमगाव) यांनी प्रविणला बोलावून घेतले. “तू तुझी रस्त्याला लागून असलेली दुकानाची टपरी का काढून घेत नाहीस?” असा जाब विचारत वाद घातला. त्यानंतर अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांना मारहाण केली. एकाने रस्त्यावरील काठीने प्रवीणला बेदम मारहाण करून दुखापत केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी प्रविण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे राजेंद्र बाळकृष्ण सावंत, दिगंबर बाळकृष्ण सावंत, विजय संजय सावंत आणि चंद्रभान भागवत कोळी यांच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र भदाणे करत आहेत.


Protected Content

Play sound