Home क्राईम अश्लिल चाळे करत विनयभंग करून महिलेला बेदम मारहाण

अश्लिल चाळे करत विनयभंग करून महिलेला बेदम मारहाण

0
104

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत अश्लिल चाळे करून विनयभंग करत मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची खळबळजनक घटना बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी अडीच वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरातील एका भागात २६ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता पिडीत महिला ही त्यांच्या घराजवळील परिसरातून जात असतांना संशयित आरोपी आशिष पांडूरंग जोहरे रा. पिंप्राळा, जळगाव याने महिलेला अंगावर ओढून तिच्या सोबत अश्लिल चाळे करत विनयभंग केला. एवढेच नाही तर पिडीत महिलेला चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार समोर समोर आल्यानंतर पिडीत महिलेने रामांनद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून फिर्याद दिली. त्यानुसार संशयित आरोपी आशिष पांडूरंग जोहरे (रा. पिंप्राळा, जळगाव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे.


Protected Content

Play sound