Home क्राईम तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद!

तलवार घेऊन दहशत माजवणारा तरुण जेरबंद!


पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या एका १९ वर्षीय तरुणाला पाचोरा पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली असून पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील जारगाव चौफुली परिसरात एक तरुण धारदार लोखंडी तलवार घेऊन फिरत असल्याची गोपनिय माहिती पाचोरा पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीसांनी धडक कारवाई केली. जारगाव चौफुली येथे सापळा रचून संशयित तरुण सोमनाथ वना पाटील (वय १९, रा. हनुमान नगर, पाचोरा) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून एक धारदार लोखंडी तलवार हस्तगत करण्यात आली. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाईसाठी संशयित आरोपीला पाचोरा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनि कृष्णा घायाळ, पो.कॉ. संदीप राजपूत, जितेश पाटील, योगेश पाटील आणि हरीश परदेशी यांनी केली आहे.


Protected Content

Play sound