Home Cities जळगाव काँग्रेसविरोधात भाजप महिला मोर्चाचे जाहीर निषेध आंदोलन

काँग्रेसविरोधात भाजप महिला मोर्चाचे जाहीर निषेध आंदोलन


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक स्तरावर भारताच्या नेतृत्वाची दखल घेतली जात असताना आणि ‘जागतिक AI Impact Summit’ सारख्या महत्त्वपूर्ण परिषदेत भारताच्या भूमिकेचे कौतुक होत असताना, काँग्रेस व युथ काँग्रेसच्या आंदोलनाविरोधात जळगावात भाजप महिला मोर्चाने तीव्र भूमिका घेत जाहीर निषेध आंदोलन छेडले. आंदोलनाच्या नावाखाली देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत या प्रकाराचा तीव्र निषेध करण्यात आला.

‘जागतिक AI Impact Summit’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील आपली भक्कम भूमिका मांडत जागतिक समुदायाचे लक्ष वेधले आहे. भारत तंत्रज्ञान आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रात वेगाने पुढे जात असताना काही राजकीय पक्षांकडून आंदोलनाच्या माध्यमातून देशाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना भाजप महिला मोर्चाने व्यक्त केली. जग भारताकडे आशेने पाहत असताना देशांतर्गत राजकारणासाठी अशा प्रकारे आंदोलन करणे ही देशविरोधी मानसिकता असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, जळगाव महानगर यांच्या वतीने दिनांक २४ फेब्रुवारी २०२६ (मंगळवार) रोजी सकाळी १०:३० वाजता न्यायालय चौक (कोर्ट चौक) येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर जाहीर निषेध आंदोलन आयोजित करण्यात आले. आंदोलनात घोषणाबाजी करत काँग्रेस व युथ काँग्रेसच्या भूमिकेचा निषेध व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनात जळगाव शहरांच्या महापौर दीपमाला काळे, जिल्हा महिला मोर्चा अध्यक्षा नीतू परदेसी, महिला मोर्चा उपाध्यक्षा ज्योती भानुदास बर्गे, नगरसेविका उज्वलाताई बेंडाळे, गायत्रीताई राणे, प्रतीक्षा कैलास सोनवणे, वैशालीताई पाटील, तसेच सोशल मीडिया संयोजक पुनम तिवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. याशिवाय छाया सारस्वत चिटणीस, मनीषा नाले, सुमन मराठे, विद्या पाटील, तृप्ती पाटील, नयना दुसाने आदी महिला कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.

भारतीय जनता पार्टी महानगर पदाधिकाऱ्यांमध्ये उदयजी भालेराव, विशालजी त्रिपाठी, नितीनदादा इंगळे, राहुलदादा वाघ यांची उपस्थिती होती. युवा मोर्चा पदाधिकारी महेशदादा पाटील, आकाश मोरे, हर्षल सिखवाल, अमित माळी, उन्मेष चौधरी, निलेश बाविस्कर, भूषण काकडे, हर्षल सोनवणे, अनुराज मराठे, हितेश वाणी आदी कार्यकर्तेही आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलन शांततेत पार पडले असून भविष्यात अशा प्रकारच्या कृतींना अधिक तीव्र उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.


Protected Content

Play sound