Home क्राईम अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या नराधमावर गुन्हा दाखल

0
128


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील देवगाव परिसरात एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची छेड काढून तिचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी गुरूवारी १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अडावद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित १४ वर्षीय मुलगी आपल्या मावशीसोबत गावातील ‘योगेश्वरी प्रोव्हीजन’ येथे तेल खरेदी करण्यासाठी गेली होती. यावेळी आरोपी विठ्ठल चुडामण भील (रा. देवगाव, ता. चोपडा) हा त्याच्या मोटारसायकलवर आला. त्याने पीडितेला गाठून अत्यंत अश्लील आणि लज्जास्पद मागणी करत विनयभंग केला. हा प्रकार तिने नातेवाईकांना सांगितला. याप्रकरणी पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विठ्ठल भील याच्या विरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.


Protected Content

Play sound