Home Cities जळगाव छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त साई मोरया ग्रुपचे रक्तदान शिबिर

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त साई मोरया ग्रुपचे रक्तदान शिबिर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त साई मोरया ग्रुपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात एकूण ६७ रक्तदात्यांनी रक्तदान करून मानवतेचा संदेश दिला.

साई मोरया ग्रुप आयोजित या रक्तदान शिबिराचे हे सलग अकरावे वर्ष ठरले असून, या उपक्रमाने शहरात सामाजिक कार्याची परंपरा कायम ठेवली आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहन म्हणून टी-शर्ट भेट देण्यात आला. रक्त संकलनासाठी रेड प्लस ब्लड बँक यांनी तांत्रिक सहकार्य केले, त्यामुळे शिबिराचे नियोजन सुरळीत पार पडले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी उपमहापौर मनोज चौधरी यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. यावेळी नगरसेवक विशाल भोळे, नितीन सपके, डॉ. चंद्रशेखर पाटील, नगरसेविका जयश्री पाटील, बालविश्व एज्युकेशन ग्रुपचे सचिव सौरभ चौधरी, परीट सेवा मंडळाचे अध्यक्ष अरुण शिरसाळे यांच्यासह उमेश सोनवणे, राहुल पाटील, प्रमोद चौधरी, सम्राट बेलदार आदी मान्यवर उपस्थित होते. या सर्वांनी रक्तदानासारख्या उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करत आयोजकांचे कौतुक केले.


Protected Content

Play sound