Home क्राईम भरधाव कारची दुचाकीला धडक ; दाम्पत्य जखमी

भरधाव कारची दुचाकीला धडक ; दाम्पत्य जखमी


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद ते भुसावळ महामार्गावर गोदावरी हॉस्पिटलजवळ असलेल्या उड्डाणपुलाच्या उतारावर एका भरधाव कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील पती-पत्नी गंभीर जखमी झाले असून, त्यांच्या दुचाकीचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. याप्रकरणी बुधवारी १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, भागवत खंडू महाजन (वय ५८, रा. जिजाऊ नगर, जळगाव) हे ३१ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या पत्नी सुनीता भागवत महाजन यांच्यासह दुचाकी MH 19 BN 7444 ने जात होते. नशिराबाद ते भुसावळ हायवे रोडवर गोदावरी हॉस्पिटलजवळील उड्डाणपुलाच्या उतारावर ते आले असता, मागून येणाऱ्या एका भरधाव येणाऱ्या CG 04 LJ 5277 या क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

अपघात इतका भीषण होता की, धडक लागताच महाजन दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले. यामध्ये सुनीता महाजन यांना गंभीर दुखापत झाली असून भागवत महाजन हे देखील जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक सुयोग तन्नीवार याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हलगर्जीपणाने वाहन चालवून हा अपघात घडवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी कारचालक सुयोग तन्नीरवार याच्या विरोधात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound