Home धर्म-समाज उंटावद येथे शिवजयंती उत्साहात साजरी 

उंटावद येथे शिवजयंती उत्साहात साजरी 


यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील उंटावद येथे जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लि. उंटावद आणि सार्वजनिक शिवजन्म उत्सव समिती उंटावद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमांमुळे संपूर्ण गाव शिवमय झाले होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व पूजनाने करण्यात आली. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘जय शिवराय’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवरायांना अभिवादन केले. शिवजयंतीनिमित्त गावात उत्सवी वातावरण निर्माण झाले होते.

यानिमित्ताने जिल्हा परिषद मराठी शाळा, उंटावद येथे प्रसिद्ध व्याख्याते शिवश्री संजीवजी सोनवणे (गलवाडेकर) यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग, त्यांचे शौर्य, दूरदृष्टी, संघटनकौशल्य आणि स्वराज्य स्थापनेतील योगदान यांचा सविस्तर आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

या कार्यक्रमाला उंटावद विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन शशिकांत पाटील, सरपंच छोटू भिल, सेवानिवृत्त प्रा. विश्वनाथ पाटील, प्रा. संजय पाटील, दिलीप पाटील, विवेक पाटील, डिगंबर सपकाळे, किशोर सपकाळे, पोलीस पाटील, हर्षल पाटील, अशोक महाजन, सचिव संजय महाजन, शांताराम पाटील, जगदीश पाटील, विजय पाटील, विकास पाटील, त्र्यंबक पाटील, ह.भ.प. श्रीराम महाराज, पवन पाटील, जितेंद्र पाटील, पंकज पाटील, पुष्कराज पाटील, मिलिंद सपकाळे, संकेत पाटील, नरेश कोळी, मयूर पाटील, निलेश पाटील, रंगनाथ पाटील, मुख्याध्यापक अनिल पाटील तसेच शिक्षकवृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिवजन्म उत्सव समितीचे सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Protected Content

Play sound