भुसावळ लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील गार्ड लाईन परिसरात एका भरधाव चारचाकी कारने दुचाकीला जोरात धडक दिल्याने दुचाकीस्वार तरूण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मंगळवारी १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, राजू भिकन मिस्तरी (वय ५८, रा. तापी नगर, भुसावळ) यांचा मुलगा वरुण राजू मिस्तरी (वय २३) हा १० फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास आपली दुचाकी (क्रमांक MH 19 ES 3112) घेऊन घरी परतत होता. गार्ड लाईनजवळील सार्वजनिक रोडवरून जात असताना, समोरून येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारने (क्रमांक MH 15 EB 2512) त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात तरूणाच्या पायाला दुखापत झाली. याबाबत कार चालक सुनिल नामदेव तळेले रा. वरणगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस नाईक जुबेर तडवी करत आहेत.




