Home क्राईम अज्ञात वाहनचालकाच्या धडकेत माय-लेक गंभीर जखमी

अज्ञात वाहनचालकाच्या धडकेत माय-लेक गंभीर जखमी


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जैन व्हॅलीजवळ असलेल्या वळणावर एका भरधाव अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. या अपघातात दुचाकीस्वार तरुण आणि त्याची आई दोघेही जखमी झाले असून, याप्रकरणी मंगळवारी १७ फेब्रुवारी रेाजी रात्री १२ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, एजाज मुनीर खान (वय २४, रा. बळीराम पेठ, जळगाव) हे व्यवसायाने फळविक्रेते आहेत. रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास एजाज हे आपल्या आईसोबत दुचाकी (क्र. एम एच ०२ डी बी ७१२८) वरून जळगावकडून पाचोराच्या दिशेने जात होते. ते जैन व्हॅलीजवळील वळणावरून जात असताना, समोरून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने (क्र. एम एच १९ डी जे १८३९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील माय-लेक रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांना दुखापत झाली. या घटनेनंतर एजाज खान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound