Home क्राईम महसूल पथकाला पाहताच वाळूमाफिया ट्रॅक्टरसह झाला पसार !

महसूल पथकाला पाहताच वाळूमाफिया ट्रॅक्टरसह झाला पसार !


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील वाकडी गावातून अवैधपणे वाळूची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल पथक कारवाईसाठी गेले असता ट्रॅक्टर चालकानं पथकाला पाहून वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाले. ही घटना सोमवारी १६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता घडली. याबाबत रात्री १० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

वाकडी गावातून अवैधपणे वाळूची वाहतूक होत असल्याची माहिती जळगाव तालुका महसूल पथकाला मिळाली होती. त्यानुसार गावाचे पोलीस पाटील विठ्ठल काशीनाथ पाटील आणि महसूल सेवक रामदास मंगा भंगाळे यांनी सोमवारी १६ फेबुवारी रोजी सकाळी १० वाजता पथक कारवाईसाठी आले होते. त्यावेळी एका ट्रॅक्टरमधून विनापरवाना वाळूची वाहतूक होत असल्याचे दिसून आले. त्यावेळी पथकाला पाहून टॅक्टर चालक याने वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेवून पसार झाले. याप्रकरणी रात्री १० वाजता पोलीस पाटील विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालक सिताराम शिवा पाटील रा. कुऱ्हाळदे ता. जळगाव आणि बापू गोविंदा पाटील रा. वाकडी ता. जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound