Home क्राईम खेडी परिसरात बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला !

खेडी परिसरात बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मणुमाता नगर भागात एक धाडसी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरापासून जवळ असलेल्या खेडी शिवारात संदीप अशोक पाटील (वय ३७) हे वास्तव्याला आहे. १४ ते १६ फेब्रुवारी दरम्यान त्यांचे घर होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या लोखंडी दरवाजाचा कडा तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी बेडरुममधील कपाटाचे लॉकर तोडून त्यात ठेवलेली १ लाख ८० हजार रुपयांची रोख रक्कम आणि सोन्या-चांदीचे दागिने असा एकुण एकूण ४ लाख ६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे करत आहेत.


Protected Content

Play sound