Home क्राईम शेतकऱ्याच्या गोडावूनवर चोरट्यांचा डल्ला ; मुद्देमाल लांबविला

शेतकऱ्याच्या गोडावूनवर चोरट्यांचा डल्ला ; मुद्देमाल लांबविला


चोपडा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील धानोरा गावी एका शेत गोडाऊनमध्ये धाडसी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरांनी गोडाऊनचे कुलूप तोडून सुमारे ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल लंपास केला असून, याप्रकरणी अडावद पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धानोरा येथील रहिवासी रज्जाक अमीर तडवी (वय ५५) यांचे धानोरा गावी शेत गट नं. ४०६ मध्ये गोडाऊन आहे. ही चोरी ७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली. अज्ञात आरोपींनी संधी साधून गोडाऊनचे कुलूप तोडले आणि आत प्रवेश केला.

५० हजारांचा मुद्देमाल चोरीला :
गोडाऊनमधून चोरांनी ५० हजार रुपये किमतीचा काळा, हिरवा तसेच पिवळसर रंगाचा ‘सलई डिंक’ चोरून नेला आहे. रज्जाक तडवी यांनी १५ फेब्रुवारी रोजी अडावद पोलीस स्टेशन गाठून या चोरीबाबत फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.

तपास सुरू :
घटनेची माहिती मिळताच अडावद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद तात्यासाहेब वाघसो यांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अन्वर तडवी हे करत आहेत. अद्याप आरोपींना अटक झालेली नाही, मात्र पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.


Protected Content

Play sound