Home क्राईम ब्रेकिंग : “तो” रेल्वे अपघात नाही तर तरुणाची हत्या, दोघांना अटक !

ब्रेकिंग : “तो” रेल्वे अपघात नाही तर तरुणाची हत्या, दोघांना अटक !


जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | खंडेराव नगर रेल्वे पुलावरील रेल्वे रुळावर एका ५० वर्षीय व्यक्तीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. अमर वसंत सपकाळे (वय ५०, रा. खंडेराव नगर, जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेत दोन जणांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत अमर सपकाळे आणि दोन संशयित यांच्यात कोणत्यातरी जुन्या किंवा किरकोळ कारणावरून वाद घातला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपींनी रागाच्या भरात जळगाव ते भुसावळ दरम्यान असलेल्या रेल्वे रुळावर अमर सपकाळे यांना गाठले आणि त्यांच्या डोक्यात मोठा दगड घालून त्यांना जिवे ठार मारले. ही घटना १४ फेब्रुवारीच्या रात्री ८ ते १५ फेब्रुवारीच्या सकाळी ८ वाजेच्या दरम्यान घडली.

रविवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता अमर सपकाळे यांचा मृतदेह खंडेराव रेल्वे रूळावर मृतदेह मिळून आल्याने खळबळ उडाली होती. दरम्यान पोलीसांनी पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी मयत अमर सपकाळे यांचा मुलगा गिरीश अमर सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोन संशयित आरोपी यांच्या विरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच पोलीसांनी दोघांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रनशिवरे हे करीत आहे.


Protected Content

Play sound